oplus_2098176
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:

प्रति वर्षाप्रमाणे चापगाव येथील श्री दुर्गादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाची सांगता आज विजयादशमी दिवशी मोठ्या उत्साहात महाप्रसादाने व विविध धार्मिक कार्यक्रमाने करण्यात आली. या कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत सन्मान व रणरागिनींचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. येथील श्री दुर्गादेवी मंदिरात सतत नऊ दिवस जागर करण्यात आला. प्रति वर्षाप्रमाणे विजयादशमी दिवशी दुर्गादेवी उत्सव मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रारंभी दुर्गामाता देवीचे पूजन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजपाचे तालुका माजी अध्यक्ष संजय कुबल, राजेंद्र रायका आदींच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात दीप प्रज्वलन ग्रामपंचायत माजी अध्यक्ष रमेश धबाले ग्रामपंचायत सदस्य मारुती चोपडे, माजी उपसभापती मल्लाप्पा मारीहाळ, ग्रामपंचायत सदस्य नजीर सनदी, माजी सभापती सयाजी पाटील आदींच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर ग्रामपंचायत अध्यक्ष गंगा व गुरुवार उपाध्यक्ष मालूबाई पाटील निवृत मुख्याध्यापक भालचंद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य नागराज यळूरकर, महादेव दळवी, बाबु घारसी, बाजीराव पाटील, ज्येष्ठ नागरिक बाळाप्पा धबाले, निवृत्त शिक्षक विलास धबाले, एम आर पाटील, रुद्रप्पा अंगडी, पंच कमिटीचे सदस्य नारायण गोदी व सर्वपंच मंडळी व गावातील अनेक ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते विविध दैवत यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत चे निवृत शिपाई महादेव बसवंत मादार होते.

तीन रणरागिणींचा सत्कार…
या कार्यक्रमाचे अवचित साधून नुकताच मलप्रभा सहकारी साखर कारखान्यावर भरघोस मुलांनी निवडून आलेल्या सूचना ललिता भालचंद्र पाटील, चापगाव येथील टीकाप्पा धबाले यांची नात डॉक्टर स्नेहा सोमलिंग धबाले यांनी एमबीबीएस शिक्षण घेऊन उच्च पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचाही या ठिकाणी सन्मान त्याचप्रमाणे दलित समाजातून शिकत नर्स कोर्स करून सरकारी सेवेत काम करणारे हेमा उदय मादार या तिघींचा यावेळी श्रीफळ शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रमेश धबाले, मल्लाप्पा मारिहाळ, सयाजी पाटील, भालचंद्र पाटील आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार पिराजी कुऱ्हाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवाजी मादार, महादेव मादार, नंदू सावते,लक्ष्मण मादार यासह दलित समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.