IMG-20251001-WA0117

खानापूर /वार्ताहर– माडीगुंजी येथील सुप्रसिद्ध देवस्थान श्री माऊली देवी यात्रौत्सव आज गुरुवारदि. 02 पासून सुरू होत आहे. हे एक गुंजीसह पंचक्रोशीतील जागृत देवस्थान मानले जाते.

महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारी देवी असा लौकिक असुन खना नारळाचीओटी, तुलाभार, सोन्या-चांदीचे दागिने अशा पद्धतीने यात्रा काळात नवस फेडले जातात. या यात्रोत्सवाची सुरुवात आज पालखी सोहळ्याने होणार असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार दि.२ रोजी सकाळी ७ वा. देवीस अभिषेक व देसाई कुटुंबीयांकडून पूजा,११ वा. देवी शृंगारण्याचा कार्यक्रम,दु. २ वा. पालखीची सवाद्य मिरवणूक व मंदिर प्रदक्षिणा, बैल जोड्या पळविणे. त्यानंतर उपस्थित भक्तांना शामसुंदर केशकामात यांच्याकडून प्रसाद, मानकऱ्यांच्या ओट्या, इंगळ्या नहाने, रात्रौ ८ वा शेजारती व प्रसाद. शुक्रवार दि. ३ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून इंगळ्या नहाने, ओटी भरणे, तुलाभार, नवस फेडणे, इत्यादी धार्मिक कार्यक्रम. दु.१२ वा. देवीस नैवेद्य व श्री माऊली जनसेवा फाउंडेशन गुंजी यांचेकडून महाप्रसाद. रात्रौ८ वा. शेजारती व प्रसाद. तसेच रात्रौ १० वा. सोशल फाउंडेशन पुरस्कृत श्री चव्हाटा नाट्य मंडळाच्यावतीने गारवा डाळिंबी चा हा नाट्यप्रयोग होणारे आहे. शनिवार दि.४ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून इंगळ्या नहाने, ओटी भरणे, तुलाभार, नवस फेडणे इ. धार्मिक कार्यक्रम. दुपारी १२ वा. संकल्प फाउंडेशन गुंजी यांचेकडून महाप्रसाद. रात्री ८ वा. शेजारती व प्रसाद. रात्रौ १० वा. सांस्कृतिक कला युवा मंच पुरस्कृत जल्लोष आर्केस्ट्रा कोल्हापुर हा कार्यक्रम होणार आहे. रविवार दि.५रोजी सकाळी ८ वाजल्यापासून इंगळ्या नहाने, ओटी भरणे, तुलाभार, नवस फेडणे इत्यादी धार्मिक कार्यक्रम रात्री ८ वा. शेजारती व प्रसाद. सोमवार दि.६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून इंगळ्या नहाने, ओटी भरणे, तुलाभार नवस फेडणे इत्यादी धार्मिक कार्यक्रम व सकाळी अकरा वाजता देवी भंडारण्याचे गाऱ्हाणे होऊन उत्सवाची सांगता होणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us