खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
खानापूर रेल्वे स्थानकाच्या विकासाबरोबर या ठिकाणी हुबळी दादर एक्सप्रेस रेल्वे संदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमन्ना यांच्यासह उत्तर कन्नडचे खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी, आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या सर्व मान्यवरांचे दक्षिण मध्ये रेल्वे सल्लागार समितीच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. उद्या सोमवार दिनांक 15 रोजी सायंकाळी 4 वाजता खानापूर येथील रेल्वे स्थानकावर विविध विकासाच्या कामाचा कोणशीला समारंभ, दादर मुंबई एक्सप्रेस रेल्वे थांब्यासंदर्भात मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला खानापूर तालुक्यातील नागरिकांनी भाजप कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजेंद्र राय का, गुंडू तोपिनकट्टी, प्रकाश निलजकर, सुनील नाईक सुनील मासेकर यांनी केला आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी
दक्षिण पश्चिम रेल्वेने हुबळी-दादर-हुबळी एक्स्प्रेसला खानापूर स्थानकावर एक मिनिटाचा थांबा दिला आहे. गाडी क्रमांक १७३१७ (एसएसएस हुबळी-दादर) ही १५ सप्टेंबर रोजी सायं. ५.५९ वाजता खानापूरला पोहोचणार असून ६.०० वाजता सुटेल. तर गाडी क्रमांक १७३१८ (दादर-एसएसएस हुबळी) ही १६ सप्टेंबर रोजी सकाळी ८.४० वाजता खानापूरला पोहोचेल.