Oplus_16777216

Oplus_16777216

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :

कॉलेजची घंटा वाजली, क्लास सुरू झाले. क्लासला जाण्याच्या धावपळीत एका विद्यार्थिनीच्या गळ्यातील सोन साखळी न कळत कॉलेजच्या प्रांगणात तुटून पडली. ती सोनसाखळी दुसऱ्या वर्गातील एका विद्यार्थिनीला सापडली. सोनसाखळी कोणाची असेल या विवांचनेत त्या विद्यार्थिनीने आपला प्रामाणिकपणा दाखवत सोनसाखळी शाळेतील मुख्याध्यापकांच्या कडे सुपूर्त केली. त्याबद्दल त्या विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल तिला रोख बक्षीस देऊन तिच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन गौरव करण्यात आला.


याबाबत अधिक माहिती, खानापूर येथील सुप्रसिद्ध स्वामी विवेकानंद पदवी पूर्व महाविद्यालयात आज नियमितपणे क्लासला प्रारंभ झाला. विज्ञान विभागात शिकणाऱ्या वैभवी देवळी या विद्यार्थिनीला 70 ते 80 हजार किमतीची एक सोनसाखळी सापडली. सदर सोनसाखळी वाणिज विभागात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची होती. ती सापडलेली सोनसाखळी कोणाची असेल याचा शोध घेत सदर वैभवी देवळी या विद्यार्थिनीने शाळेतील क्लर्क यांच्याकडे ती प्रामाणिकपणाने सुपूर्द केली. त्यानंतर मुख्याध्यापक पि. के चापगावकर यांनी सदर सोनसाखळी कोणाची असावी याचा शोध घेऊन कॉलेजच्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांची विचारपूस केली असता वाणिज्य विभागातील एका विद्यार्थिनीची असल्याचे लक्षात आले. तिच्याकडे ती सुपूर्त करण्यात आली. पण इकडे वैभवी देवळी या विद्यार्थिनीने आपला प्रामाणिकपणा दाखवत मिळालेली सोनसाखळी परत केल्याबद्दल कौतुकाची थाप देत तिचे अभिनंदन करण्यात आले. एक छोटेखानी कार्यक्रमांतर्गत शाळा व्यवस्थापन समितीचे संचालक जयंत तिनईकर यांनी त्या विद्यार्थिनीला रोख बक्षीस देऊन तिच्या या प्रामाणिकपणाबद्दल तिचे कौतुक केले. यावेळी संस्थेचे चेअरमन चेतन मनेरिकर यांनीही वैभवी च्या प्रामाणिकपदाबद्दल कौतुकाची प्रशंशा केली. यावेळी संस्थेचे सचिव सुहास कुलकर्णी, सदानंद कपलेश्वरी प्राचार्य पि.के चापगावकर, प्राचार्य विनोद मराठे, निवृत्त प्राचार्य शशिकांत पाटील, कर्मचारी संतोष परमेकर सह प्राचार्य वर्ग आदी उपस्थित होते.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us