खानापूर लाईव्ह न्यूज / प्रतिनिधी :
कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघटनेच्या खानापूर तालुका घटक श्रमिक पत्रकार संघटनेच्या वतीने उद्या शनिवार दिनांक 26 जुलै 2025 रोजी पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. खानापूर येथील छत्रपती शिवस्मारकात सकाळी 10 वाजता आयोजित या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर, उपस्थित राहणार आहेत. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा, ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान, वृत्तपत्र विक्रेत्याचा सन्मान असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी बेळगाव जिल्हा श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे, खासदार विश्वेश्वर हेगडे- कागेरी, विधान परिषद सदस्य आमदार चन्नराज हट्टीहोळी, विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी, माजी आमदार अरविंद पाटील, माजी आमदार दिगंबर पाटील, माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर आधी मान्यवर उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार पिराजी कुऱ्हाडे राहणार आहेत. कार्यक्रमाला खानापूर तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी, नगरपंचायत मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्ष व नगरसेवक, तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी राजकीय स्तरातील सर्व नेते मंडळींना निमंत्रित करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील तमाम पत्रकार मित्रांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रम द्विगुणित करावा असे आवाहन खानापूर तालुका श्रमिक पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आले.


