खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :
गेल्या काही दिवसापासून सततधार सुरू असलेल्या पावसामुळे सरकारी मराठी प्राथमिक शाळेच्या बाजूला असलेले एक सागवान झाड उंबळून पडल्याने ते विद्युत भारित तारेवर पडले त्यामुळे परिसरातील दोन ते तीन खांब मोडून पडले त्यातच एक काम एका पत्राच्या घरावर पडल्याने जोराचा आवाज आला व घरातील लोकांनी सावध होऊन घराबाहेर धाव घेतली पाहतात तो विद्युत भरीत तार घरावर पडल्याने मोठी जीवित आणि तळल्याची घटना खानापूर तालुक्यातील माणिकवाडी येथे घडली. याबाबत मिळालेली माहिती की, माणिकवाडी तालुका खानापूर येथे मंगळवारी रात्री अकरा वाजता सतत पडणाऱ्या रिपरिप पावसाने मराठी प्राथमिक शाळेजवळील सागवानी झाड कोसळून विद्युत खांबावरती पडले.त्यामुळे दोन विद्युत खांब मोडून पडले.त्यापैकी एक खांब शावेर परेरा यांच्या घरावर कोसळला विद्युत वाहिन्यांचा एकमेकांशी संपर्क झाल्याने शॉर्ट सर्किट होऊन मोठा आवाज झाला. विद्युत वाहिन्या विखरून पडल्या..झाडाच्या आणि शॉर्ट सर्किट च्या आवाजाने युवा कार्यकर्ते महादेव गावडा आणि शावेर परेरा जागे झाले. लागलीच ही बातमी ग्रा. पंचायत सदस्य प्रा.शंकर गावडा यांना कळवली. प्रा. शंकर गावडा यांनी वायरमन रणजित तसेच अधिकारी नागेश देवलतकर यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. वायरमन रणजित यांनी तात्काळ येऊन विजपुरवठा खंडित केला..प्रा. शंकर गावडा यांनी सदर झाडाच्या फ़ांद्या तोडून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला .सुदैवाने रात्रीची वेळ होती त्यामुळे जीवित हानी टळला.ही घटना गावची रहदारी असलेल्या मुख्य रस्त्यावर घडली. जवळच मराठी शाळा असल्याने खूप मोठा अनर्थ टळला.