Oplus_16908288

Oplus_16908288

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीला जोडणाऱ्या तथा नेरसा जवळून सुरू करण्यात येणाऱ्या भांडुरा प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनी चे अधिग्रहण करण्यासाठी सर्वेक्षण साठी आलेल्या प्रोजेक्टच्या अधिकाऱ्यांना रुमेवाडी, करंबळ येथील ग्रामस्थांनी घेराव घालून विरोध केला. पूर्वापर कसत आलेल्या व अनेक कुटुंबाचे उपजीविकेचे साधन असलेल्या या जमिनीतुन भांडुरा प्रकल्पाला आपला तीव्र विरोध असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्याला सांगितले. कर्नाटका निरावरील निगम लिमिटेडच्या वतीने सर्वेक्षणासाठी आलेल्या श्रीधर गोठुर नामक अधिकाऱ्याला येथील नागरिकांनी चांगलेच धारेवर धरले. भांडुरा प्रकल्प हा खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील जंगलाचे अस्तित्व नष्ट करणारा आहे. यापूर्वी हा प्रकल्प नेरसा इथून वळवून असोगा जवळ मलप्रभा नदीत सोडण्याचा प्रकल्प होता. पण त्या प्रकल्पाला न्यायालयीन अडचण निर्माण झाल्याने कर्नाटक निरावरील निगमने आता दुसरा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यामध्ये असोगा शेडेगाळी तसेच करम्बल येथील शेकडो एकर जमीन कब्जा करून जमिनी खालून पाईप घालण्याचा हा प्रकल्प आखला आहे. या प्रकल्पासाठी रुमेवाडी येथील जवळपास 500 शेतकऱ्यांना नोटीसा बजावण्यात आले आहेत. शिवाय करंबळीतीलही 300 शेतकऱ्यांना नोटीसा बजावण्यात आले आहेत. सदर शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून या प्रकल्पासाठी लागणारी जमीन देण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती त्या अधिकाऱ्यांनी केली. मात्र येथील शेतकऱ्यांनी आपली जमीन कोणत्याही परिस्थितीत या प्रकल्पाला देणार नाही असा पावित्र्य घेतला. यापूर्वीही येथील नागरिकांनी बागलकोट येथील कर्नाटक निरावरील निगमच्या कार्यालयाला भेट देऊन आपले म्हणणे मांडले आहे. आता पुन्हा येथील जवळपास 500 हून अधिक शेतकऱ्यांना नोटिसा बजावून या जमिनी संदर्भात ना हरकत घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अधिकारांना चांगलेच धारेवर धरून त्यांची पळताभुई केली.

Do Share
error: Content is protected !!
Call Us