Photo_1748359808331

चापगाव लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :

चापगाव येथील जागृत व दक्षिण मुख असलेल्या श्री हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार हाती घेण्यात आला आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायतचे सदस्य व माईन ओनर मारुती पुन्नाप्पा चोपडे यांनी स्वखर्चाने सदर मंदिराची उभारणी केली आहे. या मंदिरासाठी जवळपास 25 लाख रुपये त्यांनी स्वतः खर्च केला आहे. सदर मंदिराचे काम पूर्णतः आले असून आज मंदिरातील जुनी गर्भगुडी काढून श्री हनुमान मूर्तीला नूतनीकरण करण्यात येणार आहे. येत्या 30 तारखेला सदर मंदिरातील श्री हनुमान मूर्ती हलवून मंदिरातील उर्वरित कामे हाती घेण्यात येणार आहेत. याकरिता आज मंगळवारी गावातील पंचमंडळी व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये मंदिरात गाभाराकडून जुन्या गर्भगुडीचे काम हाती घेण्यात आले. मंदिरातील संपूर्ण फरशी बसवण्याचे काम सुरू आहे. येत्या महिन्याभरात सर्व कामे मार्गी लावून लवकरच या मंदिराचा वास्तुशांती झाल्यानंतर मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व उद्घाटन कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. सदर श्री हनुमान मंदिर हे दक्षिणमुख हनुमान मंदिर आहे या मंदिरात पूर्वी एक लहान मूर्ती पूर्वीच्या ज्येष्ठ मंडळींनी स्थापन केली होती. गेल्या 40 वर्षांपूर्वी सदर मंदिरात नवीन मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली होती मात्र मंदिर लहान असल्याने या मंदिरात पूजाअर्चा करणे अवघड जात होते. सदर मंदिराचा महिमा आघाद आहे. त्यामुळे या मंदिराला गावच्या देवस्थान मध्ये अग्रस्थानी मांडले जाते. श्री मारुती चोपडे यांनी या देवाची सेवा करत या मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा संपूर्ण खर्च स्वतः हाती घेऊन पंचमंडळींच्या सहकार्यातून या मंदिराचे काम पूर्णत्वाला आणले आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. लवकरच या मंदिराचे काम पूर्ण होऊन उद्घाटन व मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे यावेळी पंचमंडळीने सांगितले.

Do Share
error: Content is protected !!
Call Us