
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
चन्नेवाडी ता.खानापूर येथील शिक्षक व येळ्ळूर येथील चांगळेश्वरी शिक्षण संस्थेच्या गणेबैल हायस्कूल गणेबैल चे क्रीडा शिक्षक श्री. किरण राजाराम पाटील यांना गोवा येथील आयोजित एका कार्यक्रमात क्रीडाशिक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला,
इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी व नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार आपल्या क्षेत्रात विशेष कामगिरी करण्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. किरण पाटील यांनी क्रीडा शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन संस्थेतर्फे राष्ट्रीय आदर्श क्रीडा शिक्षक गौरव पुरस्कार साखळी गोवा येथील विशेष कार्यक्रमात अरविंद घट्टी यांच्या हस्ते रविवार दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी प्रदान करण्यात आला. किरण पाटील यांना येळ्ळूर येथील चांगळेश्वरी शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री.वाय. बी.मजुकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.
या पुरस्कार वितरण सोहळ्या समयी संस्थेचे सचिव प्रसाद मजुकर,मुख्याध्यापक आर.बी.पाटील,शेखर पाटील,भावेश पाटील उपस्थित होते.