
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
खानापूर येथील को op बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीचूरशीच्या वातावरणात पार पडली. या निवडणुकीत सहकार पॅनल ला बहुमताने निवडून देऊन मतदाराने या बँकेच्या प्रगतीसाठी एक विशेष पाऊल उचलले आहे. आज गुरुवारी या बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक देखील बिनविरोध पार पडले. यामध्ये अध्यक्षपदी श्रीयुत अमृत महादेव शेलार यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी संचालक मेघशाम ज्योतिबा घाडी यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक परशराम गुरव , डॉक्टर चंद्रकांत पाटील, श्री रमेश नार्वेकर , श्री विठ्ठल गुरव, श्री विजय देवप्पा गुरव , श्री मारुती पाटील संचालिका अंजली कोडोली , अंजुबाई गुरव, श्री मारुती बिलावर, श्री अनिल बुरुड त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. यासह अनेक जण उपस्थित होते.
खानापूर को-ऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक ही प्रतिष्ठेची मांडली गेली होती. या निवडणुकीत श्री विद्यमान चेअरमन अमृत शेलार यांनी संस्थेचा डोलारा एक अति हाताळा त जेष्ठ व श्रेष्ठ संचालकांना विश्वासात घेऊन या संस्थेमध्ये त्यांनी गेल्या तीन-चार वर्षात भरभराटी आणली आहे. संस्थेला आधुनिकीकरण करून या संस्थेचा कारभार पारदर्शक ठेवण्यास त्यांनी हातखंडा राखला आहे यामुळेच नुकताच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत देखील मतदारांनी त्यांना एकतर्फी विजयाची माळ घातली. यामुळे त्यांना पुन्हा एकदा विद्यमान संचालक मंडळाने जबाबदारी दिली असून आज झालेल्या निवडणुकीत त्यांना बिनविरोध निवड करण्यात आले आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड बिनविरोध झाल्यानंतर निवडणूक अधिकारी तसेच उपस्थित बँकेच्या कर्मचारी वर्ग व उपस्थित अनेक जेष्ठ भागधारकांनी उभे त्यांचे अभिनंदन केले.
100 कोटी ठेवींचा टप्पा पार करणार! अमृत शेलार ..
खानापूर को ऑफ बँकेवर श्री अमृत शेलार यांची फेरनिवड झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांची बोलताना म्हणाले, या को-ऑप बँकेला शंभर वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे या बँकेच्या ठेवीदेखील 100 कोटीच्या वर आणण्याचा आपला प्रयत्न आहे. बँकेला आधुनिकरणाची जोड देत बँकेचा विस्तार वाढवण्यासाठी आपले यापूर्वी प्रयत्न झाले आहेत. असेच प्रयत्न पुढील काळातही ठेवणार आहोत. भागधारकांनी जो विश्वास आमच्या सहकार पॅनलवर ठेवला आहे याच विश्वासाला पात्र राहून आपण कार्यतत्पर राहू असे त्यांनी यावेळी बोलून दाखवले. यावेळी त्यांना शुभेच्छा देणारी अनेकांची भाषणे झाले.
ಖಾನಾಪುರದ ಸಹಕಾರಿ ಬ್ಯಾಂಕಿನ ಐದು ವರ್ಷಗಳಿಗೊಮ್ಮೆ ನಡೆಯುವ ಚುನಾವಣೆಗಳು ಉದ್ವಿಗ್ನ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ನಡೆದವು. ಈ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಸಹಕಾರಿ ಸಮಿತಿಯನ್ನು ಬಹುಮತದಿಂದ ಆಯ್ಕೆ ಮಾಡುವ ಮೂಲಕ, ಮತದಾರರು ಈ ಬ್ಯಾಂಕಿನ ಪ್ರಗತಿಗೆ ವಿಶೇಷ ಹೆಜ್ಜೆ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ಬ್ಯಾಂಕಿನ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮತ್ತು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಹುದ್ದೆಗೆ ಗುರುವಾರ ಅವಿರೋಧವಾಗಿ ಚುನಾವಣೆ ನಡೆಯಿತು. ಶ್ರೀ ಅಮೃತ್ ಮಹಾದೇವ್ ಶೇಲಾರ್ ಅವರು ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಅವಿರೋಧವಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾಗಿದ್ದಾರೆ. ನಿರ್ದೇಶಕ ಮೇಘಶಮ್ ಜ್ಯೋತಿಬಾ ಘಾಡಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ, ಸಂಸ್ಥೆಯ ಹಿರಿಯ ನಿರ್ದೇಶಕರಾದ ಪರಶ್ರಾಮ್ ಗುರವ, ಡಾ. ಚಂದ್ರಕಾಂತ್ ಪಾಟೀಲ್, ಶ್ರೀ ರಮೇಶ್ ನಾರ್ವೇಕರ್, ಶ್ರೀ ವಿಠ್ಠಲ್ ಗುರವ, ಶ್ರೀ ವಿಜಯ್ ದೇವಪ್ಪ ಗುರವ, ಶ್ರೀ ಮಾರುತಿ ಪಾಟೀಲ್, ನಿರ್ದೇಶಕರಾದ ಅಂಜಲಿ ಕೊಡೋಲಿ, ಅಂಜುಬಾಯಿ ಗುರವ, ಶ್ರೀ ಮಾರುತಿ ಬಿಲಾವರ್, ಶ್ರೀ ಅನಿಲ್ ಬುರುದ್ ಅವರನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲೆಡೆ ಅಭಿನಂದಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ. ಅನೇಕ ಜನರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು.