IMG_20250128_233709


खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :

गेल्या 19 तारखेला चन्नेवाडी ता.खानापूर येथे आपल्या नातेवाईकांच्या अंत्यविधीला एक महिला उपस्थित होती,अंत्यविधी आटोपून आपल्या पतीसोबत दुचाकीवरून जात असताना झुंजवाड या ठिकाणी महिलेचा पतीला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून ही महिला व पडली व तिच्या डोक्याला जबर मार लागला, तेथून तिला नंदगड, तसेच बेळगाव येथील खासगी इस्पितळात नेण्यात आले, त्यानंतर तिला हुबळी येथील किम्स इस्पितळात दाखल करण्यात आले पण उपचाराचा उपयोग न होता या महिलेचा मृत्यू झाला,

सदर दुर्दैवी महिलेचा नाव सावित्री प्रभाकर पाटील असेअसून ती आळणावर तालुक्यातील कडबगट्टी या गावची आहे, झुंजवाड गावां नजीक हा गतिरोधक तांत्रिकदृष्ट्या चुकीचा असून त्या ठिकाणी कुठलाही सूचना फलक लावलेला नाही किंवा त्या गतिरोधकावरती पांढऱ्या रंगाचे पट्टेही मारलेले नाहीत, या अपघाताला जवाबदार कोण? असा सवाल नागरिकांतून होत आहे, या रस्ते विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे,

सावित्री यांच्या पश्चात सासू,पती,चिरंजीव,कन्या,सुन,जावई,नातवंडे असा परिवार आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us