IMG-20230207-WA0092


लोकोळी : लक्ष्मी देवी


तब्बल23 वर्षांनी आजपासून नऊ दिवसा चालणार्‍या लोकोळी जैनकोप येथील ग्रामदेवता लक्ष्मी यात्रा उत्सव सोहळ्याला उधाण आले आहे या सोहळय़ात देवीचा विवाह सोहळा हिंदू धार्मिक विधीप्रमाणे उद्या बुधवार दि 8 रोजी पहाटे 6.21 च्या मुहूर्तावर होणार आहे.
गेल्या दोन-तीन महिन्यापासून ग्रामदेवतेला रंगकाम हाती घेण्यात आला. याचे कामही पूर्ण झाले आहे. देवीच्या विवाह सोहळय़ाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. मंगळवारी रात्री बारा वाजता गावातील प्रमुख पंच मंडळी स्थळ देवस्थान असलेल्या ग्रामपंचायतीच्या पाठीमागील पूर्वीचे गाव वसलेल्या स्थळ ठिकाणी विधीवत देवीचा हळदी सभारंभ मंगळवारी रात्री होणार आहे. त्या ठिकाणी होम हवन आधी कार्यक्रम करणार आहेत. यासाठी गावातील सातबणचे सात यजमान त्यामध्ये पाटील घराण्यातील चार, लोकोळी गुरव व जैनकोप गुरव तसेच रयत घराण्यातील एक असे सात यजमान राहणार आहेत. तर होमहवंनाचा यजमानपद येथील मुलकी पाटील घराण्याकडे आहे. आहेर मानपान करुन विधी त्यानंतर देवीची दृष्ट काढून झाल्यानंतर नजर बंदीसाठी धार्मिक विधी केला जातो. महालक्ष्मीच्या अंगावर दागिने चढवण्यात येतात. त्यानंतर देवीला विवाह सोहळय़ाला सज्ज केले जाते. हिंदू रितिरीवाजाप्रमाणे देवीचा विवाह सोहळा भटजीच्या उपस्थितीत करण्याची परंपरा आहे. मंगलाष्टकांच्या तसेच सवाद्य गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत अक्षतरोपण केल्या जातात. हर हर महादेव, लक्ष्मी माता की जय च्या गजरात देवीचा विवाह सोहळा सूर्योदयाला साक्ष ठेवून थाटात केला जातो. या विवाह सोहळय़ाला तालुक्याच्या कानाकोपर्‍यातtन भक्तजण आवर्जुन उपस्थित राहतात.
देवीच्या विवाह सोहळय़ानंतर रितिरीवाजाप्रमाणे मानपानाच्या विधी केल्या जातात. त्यानंतर देवी मंदिराभोवती वाजत-गाजत प्रदक्षिणा घालते. या लक्ष्मी देवीचा उत्सव हातावर देवी खेळवणेचा असल्याने गावातील युवावर्ग भगवा पताका डोकीला बांधून तसेच भंडार्‍याची उधळण करुन जल्लोष साजरा करतात. लोकोळी गावात देवी आल्यानंतर पहिल्या ओटीचा मान पाटील बंधू यांच्या घराण्याकडे येतोय. त्यानंतर गावातील मानकयांच्या, हकदारांच्या तसेच कूळ घराण्याकडे भेट व ओटी भरुन झाल्यानंतर गावातील ओट्या घेतल्या जातात. दुपारी दोन नंतर जैनकोप गावात देवीचे प्रस्थान होते. व त्या ठिकाणी गुरव घराण्याचा मान असतो. व त्यानंतर गावातील मोठ्या भरून पुन्हा सायंकाळी देवी लोकोळी गावाकडे प्रस्थान होते. त्या ठिकाणी गुरव घराण्याचा बकरा बळी देण्याचा मान झाल्यानंतर देवी गदगेकडे जाते . त्याठिकाणीहि ओटीभेटी झाल्यानंतर बर्‍याच विधी पूर्ण करण्याचा रितिरीवाज आहे. देवीला उडगामा मंदिराजवळ आणल्यानंतर गावातील नागाfरकांचा तेथे हक्क संपतो. गावच्या वेशीत गेल्यानंतर विधीवत धार्मिक विधी करुन देवीला गावच्या गदगेवर बसवले जाते. तेथे गदगेवर बसल्यानंतर गावच्या पंचाच्यावतीने ओटी भरण्यात येते. रेडय़ाची पूजा करुन देवीसमोर उभा करुन बळ फिरवले जाते.श्री महालक्ष्मी देवीच्या दंत कथेच्या आधारावरील रेडय़ाच्या अंगात संचारलेल्या देवीच्या पतीचा वध करण्याच्या नावे रेडय़ाचा बळी देण्याची परंपरा पूर्वापार आहे. परंतु अलिकडच्या काळात पशू हत्या बंदी कायद्यामुळे या परंपरेवर विरजन आले आहे. त्यामुळे रेडय़ाच्या नावे बकर्‍याचा मान दिला जातो. हा मान देत असताना रितिरीवाजाप्रमाणे मानकर्‍यांच्या हस्ते विधी करुन गाऱहाणा घालून देवीसमोरील बळ फिरवण्याचा कार्यक्रम पूर्ण केला जातो. येथील हरिजन बंधूच्या हक्क परंपरेप्रमाणे रक्ताचा टिळा व कलगडच्या गर्भ यामध्ये शिजवलेला भात दोन बुट्यामध्ये घेऊन देवीच्या गदगेभोवती मादारानी फिरवण्याची परंपरा आहे. हा सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर खर्‍या अर्थाने यात्रोत्सवाला सुरुवात होते

श्री महालक्ष्मी देवीच्या नावे रेडा सोडण्याची परंपरा व त्याचे रितीरिवाज

इतिहासात महालक्ष्मी देवीची दंत्तकथा आदी माया, आदिशक्ती भुवनेश्वरीचा जन्म एका ब्राम्हणाच्या घरी झाला. वयात आल्यानंतर ती एक हरिजन मुलाच्या प्रेमात पडते. लग्न होईपर्यंत तिला सत्य काय ते माहित नसते. पण लग्न सोहळा पार पडल्यानंतर तो हरिजन असल्याचे समजताच तिने आपला रुद्रावतार प्रकट करुन अन् शस्त्र घेऊन ती त्याला मारण्यासाठी धावत सुटते. यातtन आपली सुटका नाहि म्हणून पतीदेवाने शेतवडीत चरणार्‍या एका रेडय़ाच्या अंगात संचार केला. तेंव्हा लक्ष्मी देवीने त्या रेडय़ाचाच वध केला अशी दंत्तकथा आहे. याची परंपरा म्हणून आजहि लक्ष्मी देवीचा उत्सव जेथे होतो. तेथे देवीच्या नावे रेडा सोडण्याची परंपरा आहे. बर्‍याच ठिकाणी देवीच्या नावे सोडण्यात येणारा रेडा प्रतिवर्षी सवाल स्वरुपात दिला जातो. महालक्ष्मी यात्रा या नऊ, अकरा वर्षानी भरवल्या जातात. तर कांहि ठिकाणी यात्रा भरण्याच्या परंपरा खंडित होत चालल्या आहेत.
येथे देवीचा रेडा सोडताना गावात कडक वार पाळून त्यांच्या विधी केल्या जातात. देवीच्या नावे आहेरासाठी साडी, चोळी, बाहुल्याना दोन लहान पातळे व पूजेचे साहित्य आरास केले जाते. त्यानंतर माउली देवीकडे ओटी भरली जाते. माउली देवालयाकडे तिन्ही गावच्या पंचानी उपस्थित राहून वषीŸलदार हक्काप्रमाणे माउली देवीची ओटी भरली जाते. त्या ठिकाणी पाळीदारांनी नारळावर पाणी सोडून दिल्यानंतर कूळ घराण्याच्या हक्कधारानी गाऱहाणा घालून यात्रोत्सव पूर्ण करण्याचा संकल्प केला जातो. लक्ष्मी देवीसमोर घट पूजन करुन त्या ठिकाणी लागणार्‍या साहित्याची आरास केली जाते. कांबळय़ावर मातीचे मडके ठेवून त्या ठिकाणी घटस्थापना केली जाते.
देवीला लागणारे आहेरचे साहित्य, बांगडय़ा गडीवर ठेवून आरास केली जाते. त्याचप्रमाणे लक्ष्मी देवीच्यासमोर मातंगीचा घट पूजवून तेथेहि विधीवत पूजा केली जाते. त्या ठिकाणी रांगोळी टाकून चटईवर कांबळय़ाची गडी घालून त्या ठिकाणीहि घट पूजवला जातो. तसेच देवीच्या मंदिरासमोर व मातंगीसमोर एकूण सात पडल्या पूजवल्या जातात. त्यानंतर लक्ष्मी देवीचा रेडा मातंगीच्या घटासमोर उभा करुन गावच्या लोकांनी मंदिरासमोर उभे राहून विधीवत पूजा केली जाते. कूळ घराण्याच्या पुढाकाराने गाऱहाणा घालून श्रीफळ वाढून प्रसाद वाटला जातो. त्यानंतर रेडा देवीच्या सभोवती वाजत-गाजत पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर देवाची भेट घेऊन गावातील अन्य घराण्यांच्या भेटी घेऊन रेडा हरिजन वाडय़ाकडे प्रयाण होतो.
त्यानंतर त्याला गावात सोडले जाते अशी बऱ्याच गावांमध्ये परंपरा आहे

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us