कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचे वारे आता सुरू झाले आहेत. कर्नाटक निवडणूक आयोगाने निवडणुकीची जोरात तयारी हाती घेतली आहे. त्यामूळ आचारसंहिता कधी पासून लागू होणार हे सांगता येत नाही. कर्नाटक निवडणूक आयोगाने प्रत्येक विधानसभा क्षेत्रात निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती प्रक्रिया हाती घेतली आहे.
खानापूर विधानसभा क्षेत्रात नवीन निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खानापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग च्या वरिष्ठ अधिकारी अनुराधा वस्त्रद यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी शुक्रवारी खानापूर तालुका निवडणूक अधिकारी म्हणून आपला पदभार स्वीकारला. निवडणूक अधिकारी अनुराधा वस्त्रद यांनी आपला पदावर हाती घेतला. खानापूर तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन अनेक सूचना त्यांनी यावेळी मांडल्या. त्यानंतर खानापुरातील अनेक मतदान केंद्रांची, स्ट्रॉंग रूम, तसेच निवडणूक काळात प्रशिक्षण विभाग ठिकाणाची त्यांनी पाहणी केली. दरवेळी येथील सर्वोदया विद्यालयाच्या पटांगणात मतदान प्रशिक्षण केंद्र व स्ट्रॉंग रूम केली जात होती पण यावेळी मराठा मंडळ हायस्कूलमध्ये प्रशिक्षण केंद्र व स्ट्रॉंग रूम विभाग होणार त्यामुळे त्या ठिकाणी निवडणूक अधिकारी व तहसीलदारांनी पाहणी केली. खानापूर शहरातील आणखी काही प्रमुख मतदान केंद्रांची ही पाहणी केली. व अधिकाऱ्यांना ज्या ज्या ठिकाणी सुविधा, अविसुविधा आहेत. अशा ठिकाणांची पाहणी करून सुविधा पुर्तता करण्यासाठी आतापासूनच सूचना करण्याचेही यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी खानापूर तहसीलदारासह विभागीय अधिकाऱ्यांना सुचित केले.
15 मे पूर्वी निवडणुका होण्याची शक्यता?
कर्नाटक विधानसभेची निवडणूक मे महिन्यात होणार हे निश्चित असले तरी नेमकी निवडणूक कोणत्या कालावधीत होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तरीही कर्नाटक निवडणूक आयोगाने कर्नाटकातील सर्व विधानसभा क्षेत्रात इतक्या लवकर निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्यामुळे दहावीच्या वार्षिक परीक्षा होताच लागली निवडणूक आयोग आचारसंहिता जारी करील असा अंदाज एका अधिकाऱ्याने खानापूरला विषयी बोलताना दिला. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका 15 मे पूर्वी पूर्ण होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.