तोपिनकटी महालक्ष्मी एज्युकेशन सोसायटी संचलित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ 06 फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बेळगाव रामकृष्ण मिशन चे स्वामी मोक्षातमंदाजी महाराज त्यांचे दिव्य सानिध्य लाभले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चेअरमन व भाजप नेते विठ्ठल हलगेकर होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत शाळेच्या प्राचार्य स्वाती कमल वाळवे यांनी केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रजलान करण्यात आले.
यावेळी बोलताना पूज्य मोक्षातमंदाजी स्वामीजी म्हणाले, विद्यार्थी जीवनात यश संपादन करण्यासाठी आनंदी जीवन जगले पाहिजेत. उत्साह आणि जिद्द जीवनाच्या यशासाठी फायदेशीर ठरतात. अपयशाला न घाबरता यश जिंकण्यासाठी प्रयत्न ही कटाक्षता असणे आवश्यक आहे. यासाठी उज्वल जीवन जगण्यासाठी विद्यार्थ्यांनी आनंदी जीवन जगणे अत्यंत मोलाचे ठरते असे विचार व मार्गदर्शन व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल हलगेकर म्हणाले, शारीरिक व मानसिक बळावर प्रत्येकाला यशस्वी जीवन जगता येते. सदृढ आरोग्य व उत्तम ज्ञानांकन ह्या दोन गोष्टी यशाच्या शिखराचे पैलू आहेत. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी कर्तव्यात हार न मानता जिद्द पुढे नेणे गरजेचे असल्याचे विचार व्यक्त केले. यावेळी पियू कॉलेजचे प्राचार्य प्रसाद पालनकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे संचालक यल्लाप्पा तिरविर सह अनेक जण उपस्थित होते.