IMG_20230217_231202


आजपासुन तालुक्यात अनेक ठिकाणी भाविकांची अलोट गर्दी

पिराजी कुऱ्हाडे / खानापूर
खानापूर तालुका सहय़ाद्रीच्या माथ्यावर निसर्गसंपन्न वातावरणात वसलेला आहे. विविध दैव दैवतानी नटलेल्या तालुक्यातील मध्यावतीतून जाणार्‍या व जीवनवाहिनी समजल्या जाणार्‍या मलप्रभेच्या तिरी शिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मलप्रभेचे उगमस्थान असलेल्या कणकुंबी माउली मंदिरापासून तालुक्याच्या पूर्व भागातील सर हद्दीपर्यत एम. के. हुबळीनजीकच्या मुकांबिका मंदिरापर्यंत महाशिवरात्री उत्सवानिमित् विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मलप्रभेच्या 80 कि. मी. च्या वळणदार प्रवासात अनेक ठिकाणी पुरातन तसेच धार्मिक मंदिरे आहेत.
कणकुंबी येथील माउली मंदिर, हब्बनहट्टी येथील स्वयंभू हनुमान मंदिर, असोगा येथील रामलिंगेÍवर मंदिर, खानापूर मलप्रभा घाटातील महादेव मंदिर तसेच पूर्व भागातील हट्टीहोळी येथील विरभद्र मठ व शेवटी एम. के. हुबळीनजीक असलेले गंगाबिका मंदिर हे मलप्रभा नदीच्या वैभवात भर घालणारे आहे.
या सर्व मंदिरात महाशिवरात्रीबरोबर श्रावण मासातहि मोठ्या उlसाहात विविध कार्यक्रमाच्या आयोजनाबरोबर महापुजांचे आयोजन केले जाते. त्यामुळे पूर्व मुख वाहनार्‍या मलप्रभा नदीला विशेष महत्व मानले जाते. मलप्रभा नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे जाऊन या नदीचे बागलकोट जिल्हय़ात कुडलसंगम येथे संगम झाले आहे. त्यामुळे मलप्रभेच्या वैभवात अधिकच भर पडली आहे.

कणकुंबी येथे उगम झालेली मलप्रभा नदी केवळ एका झर्‍ यातून उगम पावताना दिसते. मात्र तिचे पात्र हळूवारपणे विस्तारत जाऊन अफाट अशा स्वरुपात पुढे वाढलेले आहे. कणकुंबी उगमस्थानापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या माउली मंदिरात शिवरात्री उत्सव साजरा केला जातो. माउलीची उत्तम सजावट करुन त्या ठिकाणी अभिषेक, महाप्रसादादी आदी कार्यक्रम साजरे केले जातात. दोन दिवस हा उत्सव साजरा केला जात आहे. माउली देवीचा पालखी सोहळा येथील रामेस्वर मंदिरापर्यंत होऊन उत्सवाची सांगता केली जाते. या उत्सवाला कणकुंबी भागातील अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

असोगा मंदिर संग्रहित छायाचित्र

Kanakumbi माऊली


मलप्रभा नदीवरील जांबोटीजवळ असलेल्या हब्बनहट्टी स्वयंभू हनुमान मंदिरातहि शिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या ठिकाणी दरवर्षी मोठी यात्रा भरते. मलप्रभा नदीच्या पात्रातच दगडी शिळेत प्रकट झालेल्या स्वयंभू हनुमान देवस्थानचा महिमा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या भागातील एक पर्यटन स्थळ म्हणून या देवस्थानकडे पाहिले जाते. स्वयंभू हनुमान देवस्थान परीसरात विकासाची बरीच कामे येथील ट्रस्टने राबविली आहेत. महािशिवरात्रीनिमित्त दि. 18 व 19 रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबर मनोरंजनाचे कार्यक्रमहि आयोजित करण्यात आले आहे.
असोगा येथील श्री रामलिंगेश्वर
मलप्रभा नदीवर खानापूर शहरापासून अवघ्या चार कि. मी. अंतरावर असलेले श्री रामलिंगेश्वर मंदिराला महत्व आहे. या ठिकाणी बारा माfहने भाविकांची गर्दी असते. या ठिकाणी दरवर्शी लग्न समारंभ, मुंजबंधन यासह धार्मिक विधीचे कार्यक्रमहि साजरे केले जातात. महाशिवरात्रीला दोन दिवस मोठी यात्र भरते. श्रावण मासातहि या ठिकाणी नेहमी गर्दी असते. या ठिकाणी रामलिंगेश्वर मंदिराला प्राचीन इतिहास आहे. काहिवर्षापूर्वी या ठिकाणी अमिताभ बच्चनच्या अभिमान या चित्रपटाचे चित्रिकरण झाल्यानंतर या देवस्थानच्या वैभवात अधिकच भर पडली. नदीच्या पात्रात असलेली स्वयंभू ईश्वर पिंडी तसेच मंदिराच्या काठावर वसलेले रामलिंगेश्वर देवस्थान भाविकांचे केंद्रबिंदू ठरते. या ठिकाणी भाविकांची वाढती गर्दी यामुळे या स्थळाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला आहे. मंदिराची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे याचा जिर्णोद्धारही करण्यात आला. या ठिकाणी आजपासून महाशिवारात्रीनिमित्त दोन दिवस होणाऱ या भरगच्च कार्यक्रमात रुद्राभिषेक, महापूजा यासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे
मला प्रभा नदी घाटाला ही विशेष महत्त्व मनःपूर्व नदी घाटावर श्री महादेव मंदिर आहे पूर्वीपासून या महादेव मंदिराला भजणारे अनेक भाविक आहेत या ठिकाणी आता सुंदर नदी घाट झाल्याने भाविकांची अलोट गर्दी होते
महाशिवरात्रीच्या निमित्ताने मलप्रभा नदी घाटावर असलेल्या महादेव मंदिरात महािशिवरात्रीच्या निमित्ताने महापूजा व तीर्थप्रसादाचे आयोजन केले जाते. मलप्रभा नदी घाटावर मुबलक पाणी असल्याने भाविकांची गर्दी होणार आहे.

मलप्रभा नदीच्या काठावर अनेक ठिकाणी माहाशिवरात्रीनिमित्त उत्सव साजरे केले जातात. कुपटगिरी गावाजवळ नदीच्या काठावर बांधण्यात आलेल्या पुंडलिक मंदिर, वड्डेबैल येथे काठानजीक असलेल्या रामलिंग मंदिरात, कामशिनकोप येथील काठावरील मंदिरातहि महाशिवरात्रीनिमित्त विशेष पुजांचे आयोजन केले जाते. तालुक्याच्या पूर्व भागातील मोठे मंदिर समजल्या जाणार्‍या चिक्कहट्टीवळी येथील विरभद्र देवस्थानचा महिमाहि अधिक आहे. नदीच्या काठावर वसलेले विरभद्र देवस्थान या भागातील श्रद्धास्थान आहे. येथील मठाधीशांच्या अधिष्ठानाखाली या देवस्थानचा कारभार पाहिला जातो. या ठिकाणी दरवषाa लग्न सोहळे, मुंजबंधन यासह अनेक धार्मिक विधीचे कार्यक्रम पार पाडतात. महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणीहि असोगा हब्बनहट्टी प्रमाणे मोठी यात्रा भरते. या भागातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

habbanhatti स्वयंभू

मुकांबिका मंदिर mk हुबळी


तालुक्याच्या शेवटच्या भागात मलप्रभा नदीच्या काठावर एम. के. हुबळीनजीक महामार्गाच्या शेजारी वसलेले गंगाबिका मंदिर सर्वश्रेष्ठ मानले जाते. जगतज्योती बसवेश्वर यांच्या धर्म पत्नी गंगाबिकाचे समाधीस्थळ म्हणून याला विशेष महत्व आहे. बाराव्या शतकातील इहिहास स्थळला आहे. या स्थळाचा अलीकडे बराच विकास साधण्यात आला आहे. मलप्रभा नदीमध्ये बेळगाव-धारवाड महामार्गाच्या बाजूला भव्य असे मंदिर उभारले आहे. हे भाविकांचे आकर्षक स्थान बनले आहे. या ठिकाणीहि महाशिवारात्रीनिमित्त उत्सव साजरा केला जातो. शिवाय जवळच असलेल्या काद्रोळी येथील अदृष्य शिवयोगी मठातहि महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरवली जाते.
एकूणच महाशिवरात्री निमित्त मलप्रभा नदीच्या काठावर या प्रमुख मंदिरासह प्रत्येक गावच्या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त पूजा अर्चा करुन शिवाची आराधना करण्याची परंपरा आहे. तालुक्याचे वैभव म्हणावे लागेल

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us