IMG-20230307-WA0146


खानापूर : मंगळवारी दुपारच्या सुमारास जांबोटी रस्त्यावर गस्त घालत असताना 12 चाकी कंटेनर मधून गोवा बनावटीची तब्बल 3905.28 लिटर गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे.खानापूर शहराजवळ आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली ही कारवाई अलीकडच्या काळातील मोठी म्हणावी लागेल.
गोवा येथून अनेक वाहने कर्नाटकाच्या हद्दीतून आंध्रा तामिळनाडू भागात जातात. चोरला तसेच अनमोड या ठिकाणी चेक पोस्ट नाके आहेत. तरीदेखील अनेक वेळा चेकपोस्ट नाक्यावर फसवून देखील मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक केली जाते. मुख्य मार्गावर अबकारी खात्याची विशेष पथके नेमणूक करण्यात आले आहेत. सदर पथके संशयास्पद वाहनांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करतात. अशा प्रकारे मंगळवारी सायंकाळी चोरट्या मार्गाने घेऊन जात असताना   ब्राउन भारत बेंझ गुड्स कॅरिअर ब्राऊन इंडिया बेंझ गुड कॅरिअर १२ चाकी कंटेनर वाहन क्रमांक: GJ-10/TATA-8276 या 12चाकी कंटेनर वाहनाची तपासणी करण्यात आली असता, त्या वाहनातून व्हिस्कीच्या 21696 (एकूण 3905.28 लिटर गोवा दारू) च्या 21696 बाटल्या वाहतूक करताना दिसून आले. त्यामुळे अबकारी खात्याच्या पथकाने चालकासह वाहन ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण अंदाजे किंमत रु. 67,73,120 इतकी आहे.


या कामी बेळगाव जिल्हा गुन्हे विभागाचे अबकारी आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ, सहकारी आयुक्त फिरोज खान किल्लेदार, यांच्या आदेशाने, कु. एम. वनजाक्षी, बेळगाव (दक्षिण), उपायुक्त रवी एम. मुरगोड, बेळगाव उपविभाग उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाव्दारे   कारवाई करण्यात आली आहे.

 आगामी कर्नाटक विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर अबकारी खात्याने गोवा सीमा वरती भागातील प्रत्येक विभागात विशेष पथके स्थापन केले आहेत. खानापुर झोन अंतर्गत जांबोटी-खानापुर रोड वर मोदेकोप्प क्रॉस नजीक मंगळवारी दुपारी अबकारी खात्याचे विभागीय निरीक्षक दावलसाब शिंदोगी, उपनिरीक्षक जयराम जी. हेगडे आणि त्यांचे सहकारी मंजुनाथ बालगप्पा,  प्रकाश डोणी यांनीही कारवाई केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर करून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us