खानापूर : तालुक्याच्या सीमा चळवळीतील अग्रणी नेते,बहुजनांचे आधारस्तंभ व जेष्ठ साहित्यिक इतिहासाचे गाढे अभ्यासक स्वर्गीय श्रीमंत उदयसिंह दत्ताजीराव सरदेसाई खानापूर यांच्या अमृत महोत्सवी पुण्यस्मरणार्थ “मी मराठी आम्ही मराठी” चळवळ जागृत ठेवण्यासाठी खानापूर तालुक्यातील समितीनिष्ठ नागरिक तसेच मराठी प्राथमिक शाळा समिती यांचा संयुक्त असा
मराठी भाषिकांचा पालक मेळावा
रविवार दि. 19 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजता शुभम गार्डन खानापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
खानापूर तालुक्याच्या शैक्षणिक सामाजिक तसेच शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य झिजवलेले स्वर्गीय माजी आमदार श्रीमंत निळकंठराव सरदेसाई यांच्या विचारधारेतून, स्वर्गीय श्रीमंत उदयसिंह सरदेसाई यांच्या सीमा चळवळ, व बहुजन समाजाला प्रेरणादायी विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी त्यांच्या आठवणी पित्तर्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज त्यांच्या अकस्मिक जाण्याला दोन वर्षे होऊन गेली.अशी थोर व्यक्ती आज हयातीत नसली तरी त्यांची विचारधारा मात्र सर्वसामान्यात कायम आहे. अशा या व्यक्तिमत्त्वाचा तिथीप्रमाणे अमृत महोत्सवी पुण्य स्मरण मार्च महिन्यात आहे. या अमृत महोत्सवी पुण्यस्मरणा निमित्त जनप्रबोधनपर पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
प्रामुख्याने मेळाव्या मागचा हेतू की, स्वर्गीय उदयसिंह सरदेसाई यांची विचारधारा या प्रबोधनाच्या माध्यमातून जागृत ठेवणे. या अंतर्गत तालुक्यात निर्माण होणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या, मराठीची चळवळ, मराठी शाळा संदर्भात प्रबोधन, बेरोजगारी मुळे होणाऱ्या युवकांच्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, व्यसनाधीनता रोखणे याबाबत पालकांची जबाबदारी अशा अनेक विषयावर या मेळाव्या अंतर्गत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रबोधन पर पालक मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी राजमाता जिजाऊ मॉसाहेबांचे वंशज नामदेवराव जाधव मुंबई हे व्याख्याते म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी खानापूर तालुक्यातील तमाम मराठी भाषिक शाळा कमिटी, पालक वर्गाने उपस्थित राहावे असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते निरंजन उदयसिंह सरदेसाई व पुण्यस्मरण आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.