खानापूर/ पिराजी कुऱ्हाडे
कर्नाटक राज्यातील अतिप्राचीन वास्तुच्या यादीत कणकुबीच्या मलप्रभा उगम स्थानावरील माउली मंदिराचाही उल्लेख आहे. पण कळसा प्रकल्पाच्या कालव्या खोदाईमुळे या पुरातन मंदिराच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला या पुरातन माउली मंदिराचे तसेच मलप्रभा उगमस्थानाचे पौराणिक व ऐतिहासिक महत्व काय आहे या लेखावरुनच समजू शकेल.
श्री माऊलीदेवी देवस्थान गावात एका निसर्गरम्य सुंदर स्थळी वसलेले आहे. हे ठिकाण सह्माद्रिच्या माथ्यावर छोट्या मोठ्या डोंगरामध्ये द-या खो-यांनी भरलेल्या व निसर्गाचा वरदहस्तच लाभलेल्या कणकुंबी गावी आहे. येथील हवा आरोग्यदायक स्वच्छ पाणी आणि एकंदर सृष्टीसौंदर्य आल्हाददायक आहे. अशी देखाव्याकडे पाहिल्यानंतर विधात्याने ही पूण्य भूमी खास देवतावास करण्यासाठीच निर्माण केली असावी, याच परिसरात बरीच लहानमोठी देव देवतांची मंदिरे आहेत
श्री माऊलीदेवी देवस्थानचा परिसर ऋषीमुनींच्या पूनित पदस्पर्शानी पवित्र झालेला आहे. कुलकमुनींच्या तपाने पावन झालेले वनक्षेत्र अशी ही कळकुंबी म्हणजे आजची “कणकुंबी.” प्राचीनकाळी ह्या परिसरात ‘कुलक’ नावाचे ऋषी सपत्नीक रहात होते ते शिवभक्त होते. ऋषीनी घोर अरण्यात जाऊन तपश्चर्या केली, त्यांना श्री शंकर प्रसन्न होऊन झाले. आणि त्यांना एक पिंडी दिली. शिवपिंडींची ऋषीनी प्रतिष्ठापना केली तेच आजचे रामेश्वर मंदिर हे मंदिर फार पुरातन असून, या मंदिराच्या एका छपरावरील पाणी पश्चिमेला महादाई नदीद्वारे अरबी समुद्राला मिळते.
कुलक ऋषीच्या आश्रमात ‘मल्ली’ नावाची मुलगी घरकामांसाठी रहात होती ती देवभक्त होती. एकदा मल्ली रानात गेली असताना एका राक्षसाची दृष्टी तिच्यावर पडली. तो तिचा पाठलाग करु लागला. मल्लीने आक्रोश केला. मल्लीचा आक्रोश ऐकून ऋषी तेथे आले. त्यांनी आदिशक्ती अंबामातेचा धावा केला देवी प्रसन्न झाली. दिन राक्षसाचा संहार केला. अशी ही अंबाभवानी ‘माऊली माता’होय. तिकडे मल्लीने स्वतःच्या रक्षणासाठी नदीत उडी घातली आणि ती गुप्त झाली. आणि पूर्वजन्मीच्या पुण्याईन जलदेवता झाली. ऋषीने मल्ली तु कोठे आहेस असे विचारताच तिने मला इकडे पहा म्हणून एक हात उंचावला. तो हात आजही आपण पाहू शकतो. ‘मला पहारे’ याचा अपभ्रंश होऊन मलप्रभा असे या नदीला नाव पडले. असी आख्यायीका सांगीतली जाते. या भागातील लोक या नदीला गंगेप्रमाणे मानतात. याच नदीच्या उगमस्थानी श्री माऊली देवीचे मव्य असे पुरातन मंदिर आहे. तिर्थक्षेत्र श्री माऊली देवस्थान बन्याच लोकांचे श्रद्धास्थान झाले आहे. ही देवता प्रत्येक भक्ताला अडचणीप्रसंगी पावते. व श्री माऊली माता व रामे श्वराचा कृपाशिर्वाद आज सर्वाना लागतो अशी आख्यायिका आहे. या पवित्र तिर्थक्षेत्र दरवर्षी बरेच उत्सव साजरे होतात. व दर बारा वर्षांनी गुरु मकर राशीत येतो. यावेळी कुंडातील तळीतील पाणी अचानक फूट दोन फूट वर चढते व दुधासारखे होते या तरुणला गंगाभागीरथी अवतरले असे समजून श्री माऊलीच्या बहिणींची भेट होते व मोठी यात्रा भरते
जलकुंभाची नव्याने निर्मिती
या ठिकाणी एक पौराणिक जलकुंभ होता परंतु तो जलकुंभ कर्नाटक सरकारने हाती घेतलेला कळसा प्रकल्पात उध्वस्त झाला त्यामुळे ती बारा वर्षांनी या जलकुंडात यात्रा भरण्याच्या पाऊलखुणा पहावयास मिळतील का असा भाविकात प्रश्न निर्माण झाला होता. कळसा प्रकल्पात सदर जलकुंभ उध्वस्त झाल्यानंतर कळसा भांडारोबा पाणी प्रकल्प योजनेअंतर्गत या ठिकाणी नव्याने जलकुंबाची निर्मिती करण्यात आली आहे अलीकडे बांधण्यात आलेल्या हा जलकुंभ पूर्वीपेक्षा बऱ्याच अंशी सुधारित आहे त्यामुळे माऊली मंदिराला एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे या जलकुंभात जेव्हा गंगा भागीरथी अवतरते तेव्हा या ठिकाणी यात्रा भरण्याच्या हेतू आखला जातो यापूर्वी सदर यात्रा 2011 मध्ये भरवण्यात आली होती वास्तविक 2021 मध्ये यात्रा होणे हा नियम होता पण कोरोनामुळे यात्रा दोन वर्षे ढकलण्यात आली सदर यात्रा आज आठ फेब्रुवारी पासून चार दिवस मोठ्या उत्साहात होणार आहे
माऊली एक रूपे अनेक
माऊली मंदिराची निर्मिती अकराशे वर्षांपूर्वीची
श्री माऊली देवी मंदिर कुणी बांधले याविषयी माहिती उपलब्ध नाही. परंतु अभ्यासकाच्या मते ते अकराशे वर्षापूर्वीचे जुने आहे. सध्याची वास्तु ही निरनिराळ्या कालखंडातून पाच टप्यातून बांधून आजच्या आकाराला पोचली आहे. गोवा-कोकण येथील बरीच मंदिरे या बांधकाम शैलीतील असलीतरी त्या सर्वात हे मंदिर जुने आहे. जगभरात प्रसिद्ध पावलेल्या अजंठा-वेरुळ येथील वास्तुकलेचा वारसा येथे प्रकर्षाने जाणवतो. या मंदिराच्या मुख्य सभागृहाचे छत हैं अजंठा-वेरुळक चन्यगृहाच्या छताच्या धर्तीवर बांधले आहे. मंदिराचा बाकीचा भाग छत्रपती शिवाजी किंवा संभाजी महाराजांनी बांधला असावा, म्हणून या मंदिराला ऐतिहासीक वारसा आहे.