दिवसभरातील घटना: 1) लोंढा नजीक आगीची ठिणगी पडून चार एकर जंगल जळून खाक 2) होनकल नजीक अज्ञांताकडून काजू बागेला आग! लाखोचे नुकसान
3) असोगा जवळ मित्रमळा ऊस फडाला आग, 200 टन जळून खाक
लोंडा : खानापूर तालुक्यातील लोंडा रेल्वे स्थानकांजी मिरज -लोंढा रेल्वे कामाच्या भुयारी मार्गाचे काम सुरू असताना आगीची ठिणगी पडून जवळ असलेल्या जवळपास चार एकर जंगल जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली आहे.
याबाबत माहिती की, लोंढा रेल्वे स्थानकाला लागून जवळपास तीनशे मीटर अंतरावर एक अंडर ब्रिज चे काम सुरू आहे. या ठिकाणी रेल्वे लाईन ओलांडून जाण्यासाठी प्रस्थापित असलेल्या लोकांना हा मार्ग व्हावा यासाठी रेल्वे विभागाने ही योजना अमलात आणली आहे. यासाठी सदर ठिकाणी वेल्डिंग द्वारे काम सुरू होते.काम करताना गुरुवारी दुपारच्या दरम्यान अचानकपणे वेल्डिंगची ठिणगी जंगलातील गवताला लागली. बघता बघता जवळपास चार एकर जंगल जळून खाक झाला आहे. आग लागताच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कर्मचारी, रेल्वे कर्मचारी व ग्रामस्थांनी अथक परिश्रम करून आग विचारण्याचा प्रयत्न केला, तरीही दुपारच्या वेळी सुसाट वारा असल्यामुळे बघता बघता आग जंगलाने घेरले व चार एकर जंगल जळून खाक झाला. उर्वरित जंगलामध्ये आग जाऊ नये यासाठी तातडीने जेसीबीच्या साह्याने चर मारून व पाणी ओतून आग विसरण्यात आली. अन्यथा किती जंगल जळला असता हे सांगता आले नसते. दरम्यान कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे जंगलाचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप लोंढा वन विभागाच्या वनपालनी केला असून संबंधित कंत्राट दाराच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
असोगा येथे मित्रमळा ऊस फडाला आग! दोनशे एकर ऊस जळून खाक
होनकल नजीक काजू मळ्याला आग! शेतकऱ्याचे नुकसान
होनकल (ता. खानापूर) गावापासुन जवळ असलेल्या सर्वे नंबर २३ मधील तीन ते चार एकर जमिनीतील काजु बागेला दुपारच्या भर उन्हात आग लागून काजू बागेचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये शेतकरी सातेरी रामचंद्र घाडी यांच्या दोन एकर जमिनीतील काजू बाग, निवृत्ती हणमंत घाडी यांच्या अर्धा एकर जमिनीतील काजू बाग, मारूती गिर्याणा घाडी यांच्या जमिनीतील अर्धा एकर का बाग जळुन खाक झाली आहे. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्ताना आर्थिक नुकसान द्यावी, अशी मागणी होनकल गावच्या नागरिकांतून होत आहे.