आंबोली:
मालवण येथून चिरेखानी दगड भरून बेळगावकडे येणारा ट्रक आंबोली घाटात दरीत कोसळून चालक ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे . अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव शंकर मनोहर पाटील वय 35 रा. दुर्गा नगर नंदगड असे आहे.
ऊशीरा मालवण येथून सुटून रवीवारी पहाटेच्या सुमारास आंबोली घाटात आले त्यांना कदाचित झोप अनावर झाली अथवा समोरुन येणाऱ्या गाडीचे प्रखर लाईट पडले की जेणे करून घाटात बेळगावच्या दिशेने येणारा ट्रक सरळ खाली गेला. ट्रक पडल्या नंतर थोडाफार दिसत होता त्यामुळे माहीती मिळाली अन्यथा माहीती मिळणे अवघड होते.
याबाबत मिळालेली की,मालवण ते बेळगांव असे चिरे वाहतुक करीत असत नेहमी प्रमाणे ते शनिवारी रात्री मालवण येथून नेहमीप्रमाणे चिरेखाने दगड भरून रविवारी पहाटे बेळगावच्या दिशेने येत असताना पहाटेच्या अंधारात चालकाचा ताबा सुटून ट्रक घाटातील दरीत कोसळल्याचे दिसून आले. आंबोली घाटात धोकादायक दरडींच्या ठिकाणी जाळी लावण्याचे काम सुरू आहे. सकाळी हे कामगार कामावर येत असताना त्यांना मुख्य दरडीच्या खाली आंबोली पासून सावंतवाडी च्या दिशेने साडेचार कि.मी. अंतरावर घाटाच्या बाजुने कटडा तुटलेला दिसला. सदर कामगारांनी त्या ठिकाणी डोकावून पाहिले असता त्यांना ट्रक करीत कोसळलेला दिसून आला. त्यांनी लागलीच ही बातमी आंबोली पोलीस दूरक्षेत्रचे ठाणे अंमलदार हवालदार दत्तात्रय देसाई यांना दिली. पो. कॉ. राजेश नाईक यांना घेऊन घटना स्थळी जाऊन पंचनामा केला. व ही बातमी त्यांच्या नातेवाईकांना कळविण्यात आली, व मृतदेहावर शैलचिकेचा झाल्यानंतर मृतदेह रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे कळते.