अल्लेहोळ : चापगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील अल्लेहोळ येथील प्रति 3 वर्षांनी होणाऱ्या श्री मरेवा देवीचा गोंधळ उत्सव कार्यक्रम बुधवार दि. 15 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. या गोंधळ उत्सवाच्या कार्यक्रमाने मंगळवार दिनांक 14 रोजी ओठ्या भरणे कार्यक्रम होईल. बुधवारी सकाळपासून दिवसभर नवसफेड कार्यक्रम होणार आहेत.
निमित्ताने बुधवारी रात्री 10 वाजता पाटील क्रिएशन कोल्हापूर रिया पाटील प्रस्तुत “वेड घुंगराच” हा बहारदार नृत्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कमिटी युवा कमिटी व गणेश उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.