IMG-20230304-WA0064

विलिंग्डन

खानापूर :मुळची खानापूर तालुक्यातील तिवोली येथील महीला क्रिकेटपटू व कोल्हापूर विद्यापीठ येथे अंतर विभागीय महिला क्रिकेट संघातून खेळणारी विलिंग्डन लोकशाहीची खेळाडू कुमारी अमृता सुभाष पाटील (एम ए भाग २) हिची कलिंगा इन्स्टिटयूट ऑफ इंडस्ट्री टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी

भुवनेश्वर ओडिशा येथे पश्चिम विभागीय अंतर विद्यापीठ महिला क्रिकेट विजयासाठी शिवाजी विद्यापीठ महील संघातून निवड झाली आहे.

या निवडीबद्दल विद्यापीठाचे मराठीचे प्राचार्य डॉ. बी. व्ही. ताम्हकर यांच्या पुष्पगुच्छ शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्य जिमखाना अध्यक्ष डॉ. राजू कांगणे, डॉ. आर. एस. पोंदे उपस्थित होते.

डेक्कन एज्युकेशन सोसायटी सांगली विभागीय अध्यक्ष डॉक्टर आराम लोमटे सदस्य रामकृष्ण पटवर्धन उज्वल उपप्राचार्य डॉ. आर. ए. कुलकर्णी उपप्राचार्य डॉ. सुरेश कुंभार उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी अधिकारी लाभले. तर अभ्यासाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गणेश सिंहासने, योगिता परमने, अशोक आंबोळे मार्गदर्शन लाभले. अमृता पाटील ही खानापूर तालुक्यातील भाजपा विभागीय कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य सुभाष पाटील यांची कन्या होय. तिच्या या निवडीबद्दल खानापूर तालुक्यातून तिचे अभिनंदन होत आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us