खानापूर : 2023 दहावीच्या वार्षिक परीक्षेत खानापूर मराठा मंडळ संचालित ताराराणी हायस्कूलची विद्यार्थिनी कु.संचिता शरद पाटील हिने 625 पैकी 606 गुण {96.96%} घेऊन बेळगाव जिल्ह्यात मराठी विभागात पहिला आली आहे. संचिता पाटील कुपटगीरी येथील लैला कारखान्याचे क्षेत्र सहाय्यक व अंगणवाडी शिक्षिका पाटील यांची कनिष्ठ कन्या आहे. तिने बेळगाव जिल्ह्यात दहावी परीक्षेत मराठी विभागात उच्चांक साधला आहे. या तिच्या यशाबद्दल तिचे अभिनंदन होत आहे. संचिता पाटील हिने संपादन केल्याबद्दल लैला साखर कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी बाळाराम शेलार यांनी तिचे व पालकांचे शाल, पेढे भरून अभिनंदन केले.