खानापूर लाईव्ह न्युज/ पिराजी कुऱ्हाडे
खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावे आजही विकासापासून वंचित आहेत. पण बहुतांश गावांना थोड्याफार सुविधाही पोहोचल्या आहेत हे नाकारता येत नाही. पण अशाच जांबोटी ग्रामपंचायत क्षेत्राच्या व्याप्तीत चापोली रस्त्यालगत असलेल्या एका चिरेखणी गावाची ओळख न्यारीच आहे. या गावाला पक्का रस्ता नाही. गावातील लोकांना पावसाळ्यात वाट नीट सावरत यावे लागते. कधी लोकप्रतिनिधी ढुंगून ही पाहत नाहीत. अशा परिस्थितीत जगताना येथील नागरिकांना मात्र हायसे वाढते. येथील नागरिकांची व स्थानिक विद्यार्थ्यांची समस्या लक्षात घेता जांबोटी ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष सुनील देसाई यांनी या गावाला आपला पदभार सांभाळल्यानंतर गावाला प्रथमतः भेट दिली. येथील शालेय विद्यार्थ्यांच्या समस्या जाणल्या व गावातील मूलभूत समस्यांची पाहणी करून अंगणवाडीच्या गळतीची व्यवस्था ही करून दिली. त्यामुळे त्यांच्या एक पाऊल विकासासाठी या कर्तव्यदक्ष कामाबद्दल येथील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
जिरेखाणी हे गाव जांबोटी ग्रामपंचायत क्षेत्रात चापोली विभागात आहे . चौफेर घनदाट जंगल, अस्वलांचा विळखा आणि जमिनीत कानिटांची रांग अशा मधून पावसाळ्यातील जीवन या भागातील नागरिकांना कंठीत करणे हे जेखरीचे काम. त्या गावाला जोडणारा संपर्क रस्ता दस्तूर खुद्द जंगलातून जातो. अलीकडेच प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत जांबोटी ते चापोलीपर्यंतचा सुसज्ज रस्ता झाला आहे हे खरे आहे. पण या रस्त्यापासून साडेतीन किलोमीटर आत जंगलात चिरेखानी नामक गाव आजही उपेक्षित आहे. या ठिकाणी काही वर्षात तीन-चार वेळा अस्वल्याचे हल्ले एक विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याची घटना ताज्या आहेत.
25 कुटुंबाचे गाव… अन् विकासाचा वनवा.
जांबोटी ग्रामपंचायत उपाध्यक्ष सुनील देसाई यांनी पदभार स्वीकारताच चापोली वार्डमधील चिरेखनी गावाच्या समस्या संदर्भात स्वतः खुद्द गावात साडेतीन किलोमीटर पायपीट करून गावातील अंगणवाडी शाळा तसेच चिखल खड्ड्याने माखलेला रस्ता तेथील अंगणवाडीची परिस्थिती, प्रायमरी शाळेची इमारत तसेच या गावापासून जवळपास साडेतीन किलोमीटर जांबोटी/ चापोलीला जोडणारा रस्ता पायपीट करून विद्यार्थ्यांची दुर्दशा पाहिली … जवळपास दीडशे वर्ष पुर्वी बसलेला हा गाव, या गावांमध्ये जवळपास 25 कुटुंब रहातात ….
या मूलभूत सुविधांचा वनवा तर.. यांच्या नशीबाच्या मातीच मारलेला आहे गावामध्ये वर्षाला एक दोन तर.. किमान मनुष्यांच्यावर हिंस्र प्राण्यांचे हल्ले होत असतात जास्तीत जास्त करून माझ्या आठ नऊ वर्षाच्या कालावधीमध्ये आज तागायत पाच ते सहा लोकांना अस्वलाने गंभीर जखमी केलेले हल्ले मी प्रत्यक्षात पाहिले सुद्धा आहेत..
दीड वर्षांपूर्वीचीच घटना अडीच वर्षाच्या बालकाला जंगलामधून चापोली मंदिर यात्रोत्सवाला जात असताना अनकळत बालकच बेपत्ता झाले वरून कोसळणारा तो धो धो पाऊस अशा या परिस्थितीत जवळपास पाच दिवसांनी या बालकाचा शोध लागला.
या गावातून विद्यार्थिनी विद्यार्थी शालेय शिक्षणासाठी अंदाजे साडेतीन किलोमीटर महा घनदाट आरण्यातून पायपीट करत जांबोटी मध्ये पुढील शिक्षणासाठी जात असतात यांचे आई-वडील आपलं बाळ सकाळी घरातून बाहेर पडल्यापासून ते संध्याकाळपर्यंत घरी पोहोचेस्तोवर डोळ्याची टक लावून आपल्या लहानग्याची वाट पाहतात. मागील वर्षी एका गर्भिणी मातेला वेदनांची सुरुवात झाली. पोटामध्ये दोन बाळ जुळी असताना सुद्धा तिला घोंगड्या मधून तर चार जणांनी खांदे लावून जांबोटीपर्यंत साडेतीन किलोमीटरचा पायी प्रवास करून तिला दवाखान्यामध्ये ऍडमिट करावे लागले या अशा सुसह्य वेदनामध्ये हा वसलेला गाव. या अशा जंगल भागांमध्ये वसलेल्या गावाची समस्या सोडविण्यास सरकारचा दृष्टीदोष बदलण्यासाठी आपण तालुक्याचे आदरणीय आमदार हलगेकर साहेब तसेच शासन दरबारी पाठपुरावा करून रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढावा यासाठी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर प्रयत्न करतील असा अशावाद या गावातील नागरिकांनी व्यक्त केला आहे.
अन ताडपत्री घालून केले संरक्षण….
जांबोटी ग्रामपंचायत उपाध्यक्ष सुनील देसाई यांनी पदभार स्वीकारताच चापोली वार्डमधील चिरेखनी गावाला चिखलातून पाय काढत भेट येथील समस्या व शालेय विद्यार्थ्यांचे त्रास या संदर्भात खानापूर लाईव्ह बोलताना ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष सुनील देसाई यांनी सांगितले की, आपण गावाच्या समस्या संदर्भात स्वतः गावात साडेतीन किलोमीटर पायपीट करून गावातील अंगणवाडी शाळा तसेच चिखल खड्ड्याने माखलेला रस्ता तेथील अंगणवाडीची परिस्थिती, प्रायमरी शाळेची इमारत तसेच या गावापासून जवळपास साडेतीन किलोमीटर जांबोटी/ चापोलीला जोडणारा रस्ता पायपीट करून विद्यार्थ्यांची दुर्दशा पाहिली …
गावामध्ये प्राथमिक विद्यालय पहिली ते पाचवी पर्यंत आहे. या शाळेच्या इमारतीला ही गळती लागल्याने विद्यार्थ्यांना पावसाळ्यातील दिवस पाण्यात बसून काढावे लागत. याची दखल लक्षात घेता शिक्षण खात्याच्या नियोजनाची वाट न पाहता इमारतीवर स्वतः चढून छतावर तात्पुरता उपाय म्हणून ग्रामपंचायत सदस्य अंजना हनबर यांचे पती शिवाजी हनंबर यांच्या सहाय्याने या संपूर्ण गावाची पाहणी करून शाळेच्या इमारतीवर ताडपत्री घालण्यात आली. आणि ज्या ज्या गावातील समस्या असतील त्या शासन दरबारी पोहोचवण्यासाठी सदैव तत्पर असणार आहे. पण यासाठी तालुक्याच्या लोकप्रतिनिधींची सात अत्यंत महत्त्वाचे असून पावसाळ्यानंतर आमदार विठ्ठल हलगेकर यांना या गावी विशेष सभा बोलावून समस्या सोडवण्यासाठी विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.