खानापूर : खानापूर तालुक्यातील खानापूर— गुंजी दरम्यान हारुरी नजीक रेल्वे खाली एकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
साडेचार च्या सुमारास तिरुपती एक्सप्रेस रेल्वे खाली एका अनोळखी युवकाने आत्महत्या केल्याचे दिसून आले आहे. सदर युवकाचे वय अंदाजे 30 असून रेल्वे पोलीसानी सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. व युवकाची ओळख पटवण्यासाठी शोध जारी ठेवला आहे.