नंदगड: जवळील जंगलात एका जंगली रेड्याची शिकार करून त्याची मास विक्री करणाऱ्या दोघांना वन विभागाने ताब्यात घेऊन त्यांच्यावर पशु हत्या निर्बंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती की, नंदगड येथे गाविरेड्याची शिकार करून त्याची मांस विक्री होत असल्याचे वन खात्याला माहिती मिळाली यानुसार मुख्य वनसंरक्षक मंजुनाथ चौहान, उप वनसंरक्षक हर्षबानू, सहाय्यक वनसंरक्षक खानापुर, संतोष चव्हाण, उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बी. नंदगड विभागाचे वनसंरक्षक कविता इरणट्टी, नंदगड विभागाचे उप वनसंरक्षक मलप्पा लचयन यांनी ही कारवाई केली. सदर जंगली रेड्याची शिकार करून येथील कलाल गल्लीतील हसन अब्दुल रहमान बेपारी तसेच हलशी गावातील डेव्हिड रेहमान फिगेर याला अटक करून सुमारे 11 किलो मांस जप्त करण्यात आले आहे. दोन आरोपीसह वन्य डुकराचे मांस, एक स्कूटी बाईक आणि दोन मोबाईल फोन या कारवाईत जप्त करण्यात आले असून आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. यावेळी वनपरिक्षेत्राधिकारी राघवेंद्र कांतिकर, मल्लेशप्पा बिरादार, समीर शेख उपस्थित होते. या कृत्यात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करा असून त्या संशयींचाही तपास वन खात्याने जारी केला आहे.